Top Recommended Stories

Mumbai News: वडापावचे आमिष दाखवून 7 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, 24 तासांत आरोपीला अटक!

Mumbai News: याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तात्काळ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी तपासाला वेग आणत आरोपीच्या शोधासाठी आठ पथक तयार केली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Published: April 28, 2022 8:02 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

7 year old girl sexually abused in ghatkopar
7 year old girl sexually abused in ghatkopar

Mumbai News : लहान मुलांवरील अत्याचाराच्या (Child Sexually Abused) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. असे असताना घाटकोपरमध्ये (Ghatkopar) एका सात वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वडापाव आणायला गेलेल्या चिमुकलीला वडापाव घेऊन देत तिचे अपहरण करत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे घाटकोपर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल अवघ्या 24 तासांच्या आत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास घाटकोपर पोलिसांकडून (Ghatkopar Police) सुरु आहे.

Also Read:

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिमच्या आनंदनगर परिसरात ही घटना घडली आहे. सात वर्षांची चिमुकली वडापाव आणण्यासाठी दुकानावर गेली होती. त्याठिकाणी आरोपी देखील होता. त्याने चिमुकलीशी गोड बोलत तिला वडापाव घेऊन दिला. त्यानंतर आरोपी तिला हाताला धरुन नजीकच्या निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने मुलीला तितेच ठेवत घटनास्थळावरुन पळ काढला.

You may like to read

दरम्यान घटनास्थळावरुन जाणाऱ्या काही नागरिकांनी मुलीला पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना आणि चिमुकलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चिमुकलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तात्काळ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी तपासाला वेग आणत आरोपीच्या शोधासाठी आठ पथक तयार केली. सुरुवातीला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तापसले. तर त्यामध्ये त्यांना आरोपी मुलीचा हात धरुन घेऊन जात असल्याचे दिसले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहेत. भिवंडीमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन अनंत शामा असे आरोपीचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे. आरोपी सचिन शामा याने याआधी देखील असे गुन्हे केले आहेत. तब्बल पाच वेळा महिला आणि लहान मुलींवर छेडछाड, अत्याचार केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट पोलिस ठाण्यात अशाच प्रकारच्या पाच गुन्ह्यात आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपी तुरुंगात होता पण कोरोना काळात तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 28, 2022 8:02 AM IST