मुंबई : कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शाळा आणि कॉलेज (School and Colleges) बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण (Online Education) सुरु आहे. आता कॉलेजच्या नवीन वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस देखील सुरु झाले आहेत. अशामध्ये मुंबईत ऑनलाईन क्लासेस दरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. ऑनलाईन क्लासेस सुरु असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरु झाला (played a porn video during an online class) आणि विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला.Also Read - Ajit Pawar Corona Positive : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत म्हणाले...

Also Read - Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप, जाणून घ्या आता कोणाकडे आहे कोणतं खातं!

मुंबईतल्या विलेपार्लेमधील एका कॉलेजच्या (college situated in Mumbais Vile Parle) ऑनलाईन क्लासेस दरम्यान ही घटना घडली आहे. मस्करीच्या भरामध्ये कोणी तरी ऑलाईन क्लास (Online classs) सुरु असताना पॉर्न व्हिडिओ अपलोड केला आणि हा व्हिडिओ सुरु झाला. अचानक पॉर्न व्हिडिओ (Porn Video) सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला. ही घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसात (Mumbai police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. Also Read - Eknath Shinde Not Reachable: उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे नाराज आहेत एकनाथ शिंदे.. जाणून घ्या शिवसेना आमदारांच्या मनातील खदखद!

कॉलेजच्या प्रोफेसरने याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात (Juhu Police Station) तक्रार दाखल केली आहे. या प्रोफेसरने पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी आणि आयटी कायद्यासंबंधित (IPC & IT Act) असलेल्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रोफेसरच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (FIR has been registered against unknown persons) करत तपास सुरु केला आहे.

दरम्यान, जुहू पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ही घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. कॉलेजच्या प्रोफेसरने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी कलम 292, 570 आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जुहू पोलिसांसोबत सायबर सेलचे अधिकारी (Cyber cell officers) देखील संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत.’