
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mumbai News : मुंबईच्या मालाडमध्ये (Malad) विषारी औषध लावलेला टोमॅटो खाल्ल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Womwn Death) झाल्याची घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी परिसरात ही घटना घडली आहे. घरामध्ये उंदरांचा (Mouse) सुळसुळाट झाल्यामुळे महिला त्रस्त झाली होती. उंदीर सतत त्रास देत असल्याने या महिलेने टोमॅटोंना विषारी औषध (poisonous drug ) लावले. चुकून या महिलेने तोच टोमॅटो मॅगीमध्ये टाकून खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मालवणीमध्ये एकच खळबळ उडाली असून तपास पोलिस (Malvani Police) करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडच्या मालवणी परिसरातील पास्कल वाडीमध्ये रेखादेवी फुलकुमार निषाद (35 वर्षे) या राहत होत्या. रेखादेवी या घरामधील उंदरांमुळे खूपच त्रस्त झाल्या होत्या. हे उंदिर घरामध्ये मोठे नुकसान करत होते. त्यामुळे रेखादेवी यांनी उंदरांना मारण्यासाठी टोमॅटोला विषारी औषध लावून ठेवले. पण या टोमॅटोने उंदरांचा मृत्यू होण्याऐवजी रेखादेवी यांचाच दुर्दैवी मृत्यू झाला.
रेखादेवी यांनी 20 जुलै रोजी टीव्ही पाहण्याच्या नादामध्ये विषारी औषध लावून ठेवलेलाच टोमॅटो खाल्ला. त्यांनी मॅगी तयार करत असताना हा विषारी टोमॅटो त्यामध्ये टाकला आणि त्यांनी ती मॅगी खाल्ली. मॅगी तयार केली त्यावेळी रेखादेवी एकट्याच घरी होत्या. मॅगी खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत खराब झाली. त्यांनी तात्काळ कुटुंबातील इतर सदस्यांना हा प्रकार सांगितला. त्यांना मुंबईतील शताब्दी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तपास केला पण त्यांना घातपात असल्याचे काहीच निदर्शनास आले नाही. त्यानंतर मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या