
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mumbai News : मुंबईतल्या (Mumbai) कुर्ल्यामध्ये एक धक्कादायक (Kurla Crime) घटना घडली आहे. गर्भवती महिलेची तिच्या दिराने हत्या (Pregnant Woman Murder) केली आहे. या घटनेमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी (Kurla Police) दिराला अटक केली आहे. या घटनेमुळे कुर्ला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वहिणीच्या प्रेमामध्ये बुडालेल्या दिराने हे टोकाचे पाऊल उचलत तिची हत्या केली. गर्भवती महिला बाळंतपणासाठी आपल्या गावी निघाली होती. पण तिच्या दिराने माहेरी जाण्यासाठी विरोध केला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामध्ये संतप्त झालेल्या दिराने आपल्या गर्भवती भावजयची हत्या केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतेदह ताब्यात घेऊन शवविच्छदेनासाठी पाठवला. या घटनेमध्ये महिलेच्या पोटातील बाळाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सोनकर आपल्या पत्नी कोमल आणि चुलत भाऊ अर्जुनसोबत कुर्ल्यामध्ये राहत होता. संजय आणि अर्जुन दोघे कॉटन ग्रीनला एका चहाच्या दुकानामध्ये काम करतात. पण अर्जुन आपल्या वहिणीच्या प्रेमामध्ये बुडाला होता. कोमल गर्भवती होती आणि तिच्या पोटामध्ये संजयचे मुल वाढत होते. ती सात महिन्यांची गर्भवती होती. तिला बाळंतपणासाठी माहेरी जायचे होते. पण अर्जुनला तिला माहेरी जाऊन द्यायचे नव्हते.
बुधवारी दुपारी अर्जुन संजयच्या घरी आला. त्यावेळी माहेरी जाणाऱ्या कोमल आणि अर्जन यांच्यामध्ये वाद झाला. अर्जुन कोमलला माहेरी जाऊन देत नव्हता. या भांडणामध्ये अर्जुनने गळा दाबून कोमलची हत्या केली. शेजारी राहणाऱ्या महिलांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. अवघ्या 24 तासांमध्ये पोलिसांनी आरोपी अर्जुनच्या मुस्क्या आवळल्या.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या