Top Recommended Stories

Mumbai people Survey : तब्बल 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेंशन, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai people Survey : मुंबईचे आयुष्य हे घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालते असे बोलले जाते. मुंबईकरांच्या आयुष्यात धावपळ असते. मात्र याचा परिणाम आता त्यांच्या आरोग्यावर होतोय.

Updated: July 29, 2022 10:52 AM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

तब्बल 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेंशन, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
तब्बल 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेंशन, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai people Survey : मुंबई ही कधीच थांबत नाही असे म्हणतात. 24 तास मुंबईही जागीच असते. त्यांचे आयुष्य हे घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालत असते. मात्र आता या सर्वांचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. तब्बल 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेन्शन (hypertension)असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या सर्वेक्षणामध्ये (Municipal Survey)समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World health organization)निर्देशानुसार महापालिकेकडून हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

पाच हजार जणांचे स्टेप सर्वेक्षण

मुंबई महापालिकेकडून (bmc) पाच हजार जणांचे स्टेप सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यामातून 34 टक्के मुंबईकर हायपर टेंशनचा सामना करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याची चिंता निर्माण झाली आहे. मुंबईकरांची होणारी सततची धावपळ, लोकल पकडण्यासाठी करावी लागणारी धडपड, खाण्याच्या अनिश्चित वेळा तसेच खाण्याच्या वाईट सवयी अशा अनेक कारणांमुळे 34 टक्के मुंबईकर हे हायपर टेंशनचा सामना करत आहेत.

You may like to read

मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी मनपाचा पुढाकार

मुंबईकरांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मुंबई मनपाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यांतर्गतच हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये जवळपास 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेंशन असल्याचे लक्षात आले आहे. आता यानंतर मनपा अधिक सतर्क झाली आहे. मुंबई मनपाकडून घरोघरी जाऊन नागरिकांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी आशा वर्कर्स आणि आरोग्य सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबत त्यांना औषधंही दिली जाणार आहेत. तसेच याविषयी जनजागृती देखील केली जाणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

हायपर टेंशनची लक्षणे काय? (hypertension Symptoms)

हायपर टेंशन असलेल्या बहुतांश लोकांना आपल्याला हा आजार झाल्याची माहितीच नसते. त्यांना लक्षणे जाणवत नाहीत. ही समस्या असेल तर सकाळी उठताच डोकेदुखी सुरु होणे, नाकामधून रक्तस्त्राव, हृदयाचे ठोके अनियमित होण्याची समस्या, नीट न दिसणे आणि कानामध्ये गुणगुणल्यासारखा आवाज येतो. जर हायपर टेंशनने गंभीर रुप घेतले असेल तर थकवा, मळमळ, उलट्या, सतत चिंतेत असणे अशा समस्या जाणवू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.