मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona virus) वेग हळूहळू ओसरत चालला आहे. पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून (Maharashtra Government) विविध उपाययोजना आखल्या जात आहे. अशामध्येच आता गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिसांनी यानिमित्ताने नियमावली जाहीर केली आहे.Also Read - Raj Kundra ची ऑर्थर रोड जेलमधून सूटका, 119 Porn Videos सापडल्याचा क्राईम ब्रँचचा खुलासा

गणेशोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी जी नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येण्यार आहे. येत्या गुरुवारपासून मास्क (Mask) न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील (vishwas nangre patil) यांनी बुधवारी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या. विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (Video Conferance) बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जावी.’ Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण 13 विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबल असणार आहेत. मुंबईत एकूण 13 झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. हे पथक झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवेल. भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची (Online darshan) सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी (Mumbai police) गणेशोत्सव मंडळांना (Ganpat mandal) केले आहे. भक्तांना मंडपात येऊन दर्शन घ्यायचे असेल तर अशा भक्तांसाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करावी. जेणेकरुन भक्तांची गर्दी होणार नाही, असे आवाहनही करण्यात आले आहे. Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश