मुंबई: देशाची राजधानी नवी दिल्लीत सन 2012 मध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या (Delhi Gang rape) घटनेच्या वेदना अजून होत असताना मुंबईत त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईतील साकीनाका (Mumbai Sakinaka) परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात (Mumbai Rape Case) आला आहे. नराधमानं पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकून तिच्यावर वार केले आहेत. पीडितेला गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहेय पीडिती अत्यवस्थ असल्याचं समजतं. दुसरीकडे पोलिसांनी (Mumbai police) या प्रकरणी एकाला अटक केली आहे. मोहन चौहान असं आरोपीचं नाव आहे.Also Read - Raj Kundra ची ऑर्थर रोड जेलमधून सूटका, 119 Porn Videos सापडल्याचा क्राईम बँचचा खुलासा

मिळालेली माहिती अशी की, ही घटना 9 सप्टेंबरला पहाटे 3 वाजेच्या सुमारास साकीनाका परिसरात ही घटना घडलीय पीडितेला अत्यवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे मुंबईसारख्या शहरात या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांना विकृत नराधमाला अटक करण्यात आली आहे. Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

मध्यरात्री पोलिस कंट्रोल रुममधील फोन वाजला…

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस कंट्रोल रुममध्ये 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री 3 वाजता फोन आला. त्या फोनवरुन एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. अधिकारी आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी पीडिता जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी पीडितेला तातडीनं उपचारांसाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश


पीडिता गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. इतकंच नाही तर पीडितेवर बलात्कार करण्यात आला असून तिच्या गुप्तां. तसेच पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालून तिला बेदम मारहान करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीडितेवर उपचार सुरू आहेत. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. मोहन चौहान असं आरोपीचं नाव आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.