Mumbai School Reopen : मुंबईत 2 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार शाळा, बीएमसीकडून परिपत्रक जारी
Mumbai School Reopen: मुंबईत कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा 2 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहे. बीएमसीकडून यासंदर्भातील परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

Mumbai School Reopen: मुंबईत कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर (Mumbai Corona updates) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा 2 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहे. बीएमसीकडून (BMC) यासंदर्भातील परिपत्रक (Circular) देखील जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन बीएमसीने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळा सुरू करण्यास मंजूरी (Approval to Reopen school) दिली आहे. तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम पूर्णवेळ आणि पूर्णक्षमतेने (full capacity) सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.(School to start at full capacity in Mumbai from 2nd March, BMC issued circular )
Also Read:
- Maharashtra Corona Update: चिंता वाढली! राज्यात 4004 नवीन रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
- Mumbai Corona updates: चिंता वाढली! ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव, 4 रुग्ण आढळले
- Maharashtra Corona Update: नागरिकांनो काळजी घ्या, राज्यात आज आढळले 1036 कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत सर्वाधिक रुग्ण
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मुंबईतील शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. बीएमसीने परित्रक जारी करून शाळा सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. ‘बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्वच्या सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 2 मार्चपासून पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु कराव्यात, असे बीएमसीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळामुद्धा ऑफलाईन पद्धतीने पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
शिक्षक, कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य
बीएमसीच्या परिपत्रकानुसार, शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यात यावे. शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार नियमित मैदानी खेळ, शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घ्यावे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे, असे परित्रकात म्हटले आहे.
खेळ, कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही
परिपत्रकानुसार, शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. परंतु मैदानी खेळ खेळताना किंवा शारीरिक कवायतींवेळी मास्क बंधनकारक नसेल. शाळांना मधली सुट्टी असेल आणि या सुट्टीत विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या