Mumbai Weather Updates: मुंबईकर गारठले! पारा 16 अंश सेल्सिअसपर्यत घसरला, मोसमातील सर्वात कमी तापमान
मुंबईतही काही भागात शुक्रवारपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. हाच पाऊस मुंबईतील वातावरण बदलाला कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत गारवा बघायला मिळत आहे.

Mumbai Weather Mercury Drops: निसर्गापुढे बळीराजा पुन्हा हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस (unseasonal rains) गारपीटीचे (Hailstorm) थैमान घातले आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात सोमवारी हवमान विभागाने राज्यातील (Maharashtra Weather Updates) काही भागात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. अशातच मुंबईकर देखील गारठले आहे (Mumbai Weather Updates) पारा 16 अंश सेल्सिअसपर्यत घसला आहे. या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. यंदाच्या मोसमातील हे मुंबईतील सर्वात कमी तापमान आहे.
Also Read:
भारतीय हवानान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपासून 10 जानेवारी दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला होता. मुंबईतही काही भागात शुक्रवारपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. हाच पाऊस मुंबईतील वातावरण बदलाला कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत गारवा बघायला मिळत आहे. पारा घसरल्याने सोमवारी सकाळी मुंबईकरांना थंडीचा जोर अनुभवला. सध्या मुंबईत सरासरी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आहे. हे तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सोमवारपासून तापमान आणखी खाली घसरू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई at 1.30 am night, 10 Jan
Another colder morning expected as the temp now observed are all below 20 deg and at few places around 17 Deg too.
Early morning out going people,…take care pic.twitter.com/fITrAMn1Yp— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 9, 2022
दरम्यान, उत्तर भारतातही थंडीची लाट आली आहे. त्याचबरोबर पुढील 48 तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि पुढील 24 तासांत उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात बर्फवृष्टीही होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गारपिटीमुळे महराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात रविवारी पावसाची रिपरिप सुरु होती. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात काढणीला आलेली तूरही पाण्यात भिजली आहे. अशातच पांढरे सोने असलेला कापूस यंदा चार पैसे देईल, अशी अपेक्षा होती. पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचे पाणी-पाणी करून टाकले आहे. दुसरीकडे, वर्ध्यातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्याला अवकाळीने झोडपून काढले आहे. अनेक भागात गारपीटही झाली आहे. गारपिटीमुळे संत्रीचे मोठे नुकसान झाले आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळीनं दोन हजार हेक्टरतील केळी, पपई, कांदा, हरभरा, मका, गहू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड, पिंपळगाव बसवंत, चांदवड तालक्यातील द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने 80 टक्के पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या