Top Recommended Stories

Central Railways Mega Block: मुंबईकरांनी रविवारी रेल्वे प्रवास करणं टाळा, 14 तासांच्या मेगाब्लॉकमुळे लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द!

Central Railways Mega Block: या मेगाब्लॉकदरम्यान लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Updated: January 23, 2022 1:06 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

मेगाब्लॉक
मेगाब्लॉक

Central Railways Mega Block : मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शक्यतो मुंबईकरांनी रविवारी लोकलने प्रवास करणे टाळावे. कारण मध्य रेल्वे (Central Railways) मार्गावर रविवारी 23 जानेवारी 2022 रोजी 14 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. ठाणे आणि दिवा धिम्या मार्गांवर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेच्या पायाभूत सुविधांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक रविवारी मध्य रात्री 1 वाजून 20 मिनिटांपासून ते रविवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपर्यत असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान लोकल ट्रेन (Local Train), मेल एक्स्प्रेसच्या (Mail Express) काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासा दरम्यान त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांनी प्रवास करणेच टाळावे.

Also Read:

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान (Thane-Diva Railway Station) डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉकसह अप जलद मार्गावर 2 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक, ठाणे-दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गांशी संबंधित पूर्वीच्या अनावश्यक ठरलेल्या धीम्या मार्गांना सध्याच्या जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्रॉसओवरची कामे करण्यासाठी घेण्यात येणार आहे. शनिवार/रविवार मध्यरात्री 1.20 वाजलेपासून ते रविवारी दुपारी 3.20 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा आणि रविवार दुपारी 12.30 वाजल्यापासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर 2 तासांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर गाड्या धावतील.

You may like to read

ब्लॉक सुरु होण्यापूर्वी दादर येथून शनिवारी रात्री 11.40 वाजलेपासून ते रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत सुटणार्‍या जलद उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. तर ब्लॉक सुरू झाल्यानंतर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी इथून सुटणाऱ्या एक्सप्रेस, तसेच फास्ट लोकल या मुलुंड आणि कल्याणच्या दरम्यान डाऊन स्लो लाईनवर डायव्हर्ट करण्यात येतील. असे असले तरी मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबणार नाहीत, असे मध्य रेल्वेनं सांगितलं आहे.

शनिवारी या रेल्वे गाड्या रद्द –

17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस
11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस
12140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

रविवारी या रेल्वे गाड्या रद्द –

22105 / 22106 मुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
22119 / 22120 मुंबई – करमळी – मुंबई तेजस एक्स्प्रेस
11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस
12071 / 12072 मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 23, 2022 1:05 PM IST

Updated Date: January 23, 2022 1:06 PM IST