Top Recommended Stories

live

Nagar Panchayat Elections 2022 Result : नगरपंचायत निवडणुकीत भाजपजी बाजी, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मिळवल्या किती जागा

राज्यातील 31 जिल्ह्यांत 106 नगरपंचायती, 2 जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर मंगळवारी मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Updated: January 19, 2022 7:40 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Nagar Panchayat Elections 2022 Result : नगरपंचायत निवडणुकीत भाजपजी बाजी, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मिळवल्या किती जागा
Nagar Panchayat Elections 2022 Result BJP won in Nagar Panchayat elections, find out which party got how many seats

Nagar Panchayat Elections 2022 Result Live: राज्यातील 31 जिल्ह्यांत 106 नगरपंचायती (Nagar Panchayat Elections 2022), 2 जि.प.  (Zilha Parishad) आणि पंचायत समिती (Panchayat Samity Election) निवडणुकीच्या मतमोजणीला (Nagar Panchayat Elections 2022 Result) सुरूवात झाली आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर मंगळवारी  मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल (Elections 2022 Result) जाहीर होणार आहे. या निवडणुकीत राज्यभरातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच काही जिल्ह्यात धक्कादायक निकाल समोर आले आहेत..

Also Read:

Live Updates

  • 7:38 PM IST

    नगरपंचायत निवडणुकीत भाजपजी बाजी, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मिळवल्या किती जागा

    106 नगरपंचायती, दोन जिल्हा परिषदांच्या 413 जागांसाठी झाली मतमोजणी
    106 पैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती, 9 नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार
    106 नगरपंचायतींच्या तब्बल 1802 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सरस
    नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक 389 जागा जिंकून भाजपनं पटकावला अव्वल क्रमांक
    382 जागा मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या, तर 284 जागांसह शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर
    नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस शेवटच्या स्थानी, 274 जागां विजय मिळण्यात काँग्रेसला यश

  • 4:10 PM IST
    अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीची शिजली नाही डाळ, आमदार रवी राणा यांची जादू कायम

    -काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात भाजपला खातेही उघडता आले नाही
    -राष्ट्रवादी काँग्रेसची हीच स्थिती, तिवसा येथे 12 जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित
    – भातकुली येथे 9 जागा जिंकून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित
    – काँग्रेस आणि रवी राणा यांचीच सत्ता असणार
    – तिवसामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यांनी चांगले काम करत काँग्रेसला अधिक बळ
  • 2:33 PM IST

    राजकारणाच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पाटील यांची दणक्यात एन्ट्री
    सांगलीत कवठेमहंकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड
    रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 17 पैकी 10 जागा जिंकत एकहाती मिळवली सत्ता
    रोहित पाटील यांच्या या दमदार विजयानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
    हा सर्वसामान्य जनतेचा विजय, विजयानंतर रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
    विजयानंतर भावूक होत रोहित पाटील म्हणाले आज आबांची खूप आठवण येते आहे

  • 12:40 PM IST
    भाजप नेत्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का; वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
    – बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का
    – बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत भाजपच्या हातून निसटली
    – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली वडवणी नगरपंचायत
    – पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपचे नेते राजूभाऊ मुंडे यांचा पराभव
    – एकूण 17 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय तर 3 जागा राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीच्या ताब्यात
    – भाजपने 8 जागांवर मिळवला विजय

    असे आहेत निकाल…

    > वडवणी नगरपंचायत निवडणूक निकाल
    भाजप – 08 जागांवर विजयी
    राष्ट्रवादी – 06 जागांवर विजयी
    राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी – 03 जागांवर विजयी
    एकूण जागा – 17

    > आष्टी नगरपंचायत
    भाजप – 13
    राष्ट्रवादी – 02
    काँग्रेस – 01
    अपक्ष – 01
    एकूण – 17

    > शिरूर कासार नगरपंचायत
    भाजप – 11
    राष्ट्रवादी – 04
    शिवसेना – 02
    एकूण – 17

    > केज नगरपंचायत
    राष्ट्रवादी – शेकाप – 05
    काँग्रेस – 03
    जनविकास आघाडी – 08
    अपक्ष – 01
    एकूण -17

    > पाटोदा नगरपंचायत
    भाजप – 09
    भाजप पुरस्कृत – 06
    महावि – 02
    एकूण – 17
  • 12:32 PM IST
    जालना जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींचे निकाल जाहीर, राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम

    – घनसावंगी, तिर्थपुरी नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
    – बदनापूर नगर पंचायतीवर भाजप आमदार नारायण कुचे यांचं वर्चस्व कायम,
    – मंठ्यात शिवसेना पुन्हा विजयी,
    – जाफ्राबाद नगर पंचायतीवर काँग्रेस,राष्ट्रवादीचं वर्चस्व
  • 11:51 AM IST
    साताऱ्यात शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांना धक्का
    – साताऱ्यातील पाटणमध्ये 17 जागांपैकी 10 वर राष्ट्रवादीचे वर्चस्व
  • 11:49 AM IST
    कर्जत- जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची विजयी घौडदौड
    – राष्ट्रवादीचे 17 पैकी 12 जागांवर वर्चस्व
    – काँग्रेसने मिवळल्या 3 तर भाजपला केवळ 2 जागांवर मानावे लागले समाधान
  • 11:44 AM IST

    पुण्यातील देहु नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

  • 11:37 AM IST
    निफाडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा धक्का
    – राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना मोठा धक्का
    – शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांना मोठे यश, भाजपचा सुफडासाफ
    – शिवसेना, शहर विकास आघाडी, बसपा आणि काँग्रेस आघाडीची नगरपंचायतमध्ये सत्ता
  • 11:35 AM IST
    वैभववाडी – देवगडमध्ये भाजपचे वर्चस्व
    -कुडाळमध्ये शिवसेनेच्या श्रुती वर्दम तसेच भाजपच्या चांदनी कांबळी विजयी

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 19, 2022 8:33 AM IST

Updated Date: January 19, 2022 7:40 PM IST