Top Recommended Stories

Breaking News: नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांवर टीका करणे पडले महागात, अटकेसाठी नाशिक पोलिस रवाना

नारायण राणे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत.

Updated: August 24, 2021 12:22 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Narayan Rane
Narayan Rane

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (CM Uddhav Tackeray) आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना चांगलेच महाग पडण्याची शक्यता आहे. या वक्तव्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांच्याविरोधात नाशिक (Nashik), पुणे (Pune) आणि महाडमध्ये (Mahad) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणे यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे यांनी केलेले विधान गंभीर असून त्यांना अटक करुन न्यायालयासमोर (Court) हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक (Nashik Police Team) चिपळूनला रवाना झाले आहे. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Also Read:

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा (Janashirvad Yatra) सध्या कोकणात आहे. आज चिपळून (Chiplun) येथे त्यांच्या यात्रेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल (Independence Day 2021) बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणे यांनी सोमवारी रायगड (Raigad) येथे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (Shivsena) चांगलीच आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे राणेंचे अशाप्रकारचे विधान करणे हे राज्याचा अपमान करणारे आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेना पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल (Filed a case against Narayan Rane) करण्यात आला.

You may like to read

नाशिक पोलिसांनी नारायण राणेंविरोधात कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेचे आदेश काढले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणेंना अटक करण्यासाठी चिपळूनला रवाना झाले आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांची अटक अटळ असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, पुणे पोलिसांचे पथक (Pune Police Team) देखील त्यांना अटक करण्यासाठी रवाना झाले आहे. यामध्ये दोन वरीष्ठ पोलिस अधिकारी आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 24, 2021 9:58 AM IST

Updated Date: August 24, 2021 12:22 PM IST