Top Recommended Stories

Money Laundering Case: अटकेनंतर Nawab Malik म्हणाले, "लडेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे"

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED)मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटक केली. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Published: February 23, 2022 6:41 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

nawab malik admitted to j j hospital
nawab malik admitted to j j hospital

Maharashtra News: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED)मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटक केली. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अटकेनंतर नवाब मलिक यांची वैद्यकीय तपापणीसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी नवाब मलिक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट केले आहे. “लडेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे” असे नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

ED ने अटकेची कारवाई केल्यामुळे नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मलिक मंत्रिपदी कायम राहणार असवल्याचे शरद पवार यांनी ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या बैठकीत म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

You may like to read

बुधवारी सकाळीच साडे सहा वाजता नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. तब्बल आठ तास कसून चौकशी केल्याप्रकरणी मलिक यांना अटक करण्यात आली. त्यांना वैद्यकीय चौकशीसाठी नेण्यात येत असताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘आम्ही झुकणार नाही तर लढणार आणि जिंकणारही.’

दरम्यान, हे प्रकरण डॉन दाऊद इब्राहिम ( Dawood Ibrahim) याच्या मालमत्तेशी संबंधित आहे. नागपाडा आणि भेंडी बाजार परिसरात खंडणी मागणे, अंमली पदार्थांची तस्करी, रिअल इस्टेटच्या विक्रीतून बेकायदेशीरपणे मिळवलेल्या पैशांशी संबंधित अनेक हवाला व्यवहार आढळून आल्यानंतर ईडी इब्राहिम, इक्बाल मिर्ची, छोटा शकील, पारकर आणि जावेद चिकना यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची ED चौकशी करत आहे.

कासकर, सलीम फ्रूट, छोटा शकीलचा मेहुणा आणि इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांचा मुलगा यासह इतरांच्या चौकशीच्या संदर्भात या एजन्सीने मुंबईतील 10 परिसरांची यापूर्वीच झडती घेतली आहे. या प्रकरणात गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा सलीम फळ, कासकर आणि पारकरच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यात नवाब मलिक यांचे नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाने केली राजीणाम्याची मागणी…

NCP नेता नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांनी राजीणामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ने अटक केली आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, ही महाराष्ट्राची परंपरा आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.