New Restrictions in maharashtra : राज्यात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता निर्बंध आणखी कडक, सोमवारपासून नवीन नियम लागू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. दैनंदिन रुग्णवाढीमध्ये वेगाने वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: January 8, 2022 10:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

New Restrictions in maharashtra : राज्यात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता निर्बंध आणखी कडक, सोमवारपासून नवीन नियम लागू

New Restrictions in maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. दैनंदिन रुग्णवाढीमध्ये वेगाने वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबदरदारीचा उपाय म्हणून निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहे. राज्य सरकारने नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. (New restrictions in maharashtra background of corona covid 19 infection rise)

Also Read:

राज्य सरकाच्या आदेशानुसार 10 जानेवारीपासून राज्यात नवे निर्बंध लागू होणार आहेत. यामध्ये लग्न सोहळ्यापासून ते इतर सार्वजनिक कार्यक्रम आणि अंत्यविधीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये लोकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार आहे.

राज्यात 10 जानेवारीपासून लागू होणारे नवे नियम खालीलप्रमाणे: (Maharashtra Corona Guidelines)

• रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू
• लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 लोक
• अंत्यसंस्कारात जास्तीत जास्त 20 लोक
• सामाजिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 लोक
• सार्वजनिक मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद
• मनोरंजन पार्क, संग्रहालय, प्राणीसंग्रहालय बंद
• स्विमिंग पूल, स्पा, ब्युटी सलून, जिम बंद राहतील
• हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने उघडतील – रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद
• शाळा-कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, कोचिंग क्लासेस बंद
• खाजगी कार्यालयात 50 % कर्मचाऱ्यांची उपस्थिती
• लेखी परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात अभ्यागतांना परवानगी नाही.
• सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना परवानगी नाही
• स्थानिक खेळ आयोजित करण्यावर बंदी
• 50 % क्षमतेसह शॉपिंग मॉल सुरू राहणार
• 50% क्षमतेसह रेस्टॉरंट-हॉटेल सुरु ठेवण्यास मुभा
• 50 % क्षमतेसह थिएटर सुरू राहणार
• डोमेस्टिक ट्रॅव्हल- दोन्ही डोस घेतलेल्यांना किंवा 72 तासांच्या आत आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल असलेल्यांना परवानगी.
• सार्वजनिक वाहतुकीमध्ये दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी आहे
• दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 9:39 PM IST

Updated Date: January 8, 2022 10:01 PM IST