Top Recommended Stories

Nitesh Rane Hospitalised: तब्येत बिघडल्यामुळे नितेश राणे रुग्णालयात, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Nitesh Rane Hospitalised : संतोष परब हल्ल्या प्रकरणी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर नितेश राणे यांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Updated: February 5, 2022 8:31 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

nitesh rane
nitesh rane

Nitesh Rane Hospitalised : शिवसेना कार्यकर्ते (Shivsainik) संतोष परब (Santosh Parab) हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर (Police Custody) शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने नितेश राणे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) केली आहे. पण न्यायालयीन कोठडीमध्ये जाण्यापूर्वीच नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात (sindhudurg district hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा मुक्काम कोठडीऐवजी रुग्णालयात असणार आहे.

Also Read:

संतोष परब हल्ल्या प्रकरणी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर नितेश राणे यांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी 8 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. तर नितेश राणे यांच्या बाजूने वकील सतिश मानेशिंदे (Adv. Satish Maneshinde) आणि वकील संग्राम देसाई (Adv. Sangram Desai) यांनी युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली आणि नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

You may like to read

संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (PA Rakesh Parab) यांना एकाच वेळी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. कारण दोघांचीही पोलिस कोठडी शुक्रवारी संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सुनावणी करत येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडी केली. दरम्यान या प्रकरणी जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर आता शनिवारी सुनावणी होणार असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील सतिश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी दिली.

काय आहे प्रकरण?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोन जणांनी आपल्यावर सशस्त्र हल्ला केला असा दावा संतोष परब यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान (Sindhudurg District Bank Election) ही घटना घडली होती. या हल्ल्यामागे भाजप आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 5, 2022 8:31 AM IST

Updated Date: February 5, 2022 8:31 AM IST