Nitesh Rane: नितेश राणे यांना मोठा धक्का! संतोष परब हल्ला प्रकरणी 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
Nitesh Rane remanded in judicial custody : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nitesh Rane remanded in Police custody : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे. सरकारी वकीलांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. कणकवली दिवाणी न्यायालायने (Kankavali Civil Court) हा निर्णय दिला आहे.
Also Read:
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी पोलिसांनी तपास अहवाल कोर्टात सादर केला. या प्रकरणात नितेश राणे यांचा थेट सहभाग असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच ज्या पीएच्या फोनवरुन फोन केले होते त्या पीएलादेखील अटक करण्यात आली असून दोघांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र आज त्यांनी हा अर्ज मागे घेतला.
काय आहे प्रकरण?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोन जणांनी आपल्यावर सशस्त्र हल्ला केला असा दावा संतोष परब यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान ही घटना घडली होती. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या