मुंबई : पदवी अभ्यासक्रमासाठी (degree courses) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाशी (mumbai university) सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये (colleges and accredited educational institutions) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची (online registration) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाकडून या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रक्रियेअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश (First Year admission)s घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.Also Read - University Admission Update 2021: पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

5 ऑगस्ट 2021 पासून म्हणजे आजपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया (online admission) सुरु झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या वेबसाईटच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी दरम्यान काही अडचणी आल्या तर त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक (helpline number) सुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हमीपत्र फॉर्म भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक –

– ऑनलाईन अर्ज विक्री – 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2021 (1 वाजेपर्यंत)

– प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2021 (1 वाजेपर्यंत)

– ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख – 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2021 (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

मेरीट लिस्ट या तारखेला होणार जाहीर –

– पहिली मेरीट लिस्ट – 17 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता होणार जाहीर.
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 (दुपारी 3 वाजेपर्यंत )

– द्वितीय मेरीट लिस्ट – 25 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होणार जाहीर.
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2021 (दुपारी 3 वाजेपर्यंत )

– तृतीय मेरीट लिस्ट – 30 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होणार जाहीर.
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 2021 (दुपारी 3 वाजेपर्यंत )