Top Recommended Stories

My Mentor.. My Hero.. My father ! वडिलांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर मुलाने केली भावनिक पोस्ट

Padma Awards 2022: कोरोना साथीच्या संकटात (Covid-19 Pandemic) कोरोना प्रतिबंधक लसची निर्मिती (Corona Vaccine) करून देशासाठी अमुल्य योगदान दिल्याबद्दल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute Of India) संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांचा केंद्र सरकारकडून गौरव करण्यात आला आहे.

Published: January 26, 2022 11:42 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

My Mentor.. My Hero.. My father ! वडिलांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर मुलाने केली भावनिक पोस्ट

Padma Awards 2022: कोरोना साथीच्या संकटात (Covid-19 Pandemic) कोरोना प्रतिबंधक लसची निर्मिती (Corona Vaccine) करून देशासाठी अमुल्य योगदान दिल्याबद्दल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute Of India) संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांचा केंद्र सरकारकडून गौरव करण्यात आला आहे. सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने (Padma Bhushan) गौरवण्यात आले आहे. वडिलांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर अदर पूनावाला (Adar Poonwalla) यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. अदर पूनावाला यांनी वडिलांसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात अदर पूनावाला हे आईच्या कुशीत दिसत आहेत. अदर पूनावाला यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Also Read:

दरम्यान, केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 128 पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2022) घोषणा केली. त्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांच्यासह राज्यातील 10 जणांचा समावेश आहे.

You may like to read

काय म्हणाले अदर पूनावाला…?

वडील सायरस पूनावाला यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अदर पूनावाला यांनी एक ट्वीट केले आहे. ‘मी भारत सरकारचा खूप आभारी आहे. त्यांनी माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील डॉ. सायरस पूनावाला यांच्या कामाची दखल घेतली.’, अशा शब्दांत अदर पूनावाला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अदर पूनावाला यांना ट्वीटसोबत एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यात अदर हे त्यांच्या मातोक्षी विलू सायरस पूनावाला (Vilu Cyrus Poonawalla) यांच्या कुशीत दिसत आहेत.

दुसरीकडे, पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सायरस पूनावाला यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, देशाच्या जडणघडणीत आपल्याला हातभार लावता आला. विशेष म्हणजे त्याची सरकारकडून दखल घेण्यात आली. इतर दिग्गजांसोबतच पद्म किताबाचा मानकरी ठरणे, हा आपल्यासाठी सर्वात मोठा बहुमान आहे. भारत सरकारचे मन:पूर्वक धन्यवाद. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. समाजात प्रत्येकाला समान आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे देखील सायरस पूनावाला यांनी म्हटले आहे.

128 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कारांमध्ये 4 पद्मविभूषण,17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात 34 महिलांचा समावेश आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 11:42 AM IST