Top Recommended Stories

Patra Chawl Case : मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ईडीचे पथक घरी दाखल

Patra Chawl Case : वारंवार चौकशीसाठी समन्स देऊन देखील संजय राऊत यांच्याकडून कोणतेही उत्तर येत नव्हते. तसंच त्यांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे आता थेट ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी सकाळी साडेसात वाजता ईडीचे पथक पोहचले.

Published: July 31, 2022 9:05 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

शिवसेनेचे खासदार संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत

Patra Chawl Case : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ईडीची टीम (ED Team) संजय राऊत यांच्या घरी दाखल झाली आहे. संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी ईडीचे (Enforcement Directorate) पथक रविवारी सकाळी पोहचले. त्यांच्या घराबाहेर सीआयएसएफचा (CISF) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पत्राचाळ प्रकरण (Patra Chawl Case) आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी वारंवार समन्स (ED Summons) पाठवून संजय राऊत यांच्याकडून काहीच सहकार्य मिळत नसल्याने ईडीचे पथक आता थेट त्यांच्या घरी आले असल्याचे सांगितले जात आहे.

पत्राचाळ प्रकरणात ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण संसदेचं अधिवेशन असल्याचे सांगून संजय राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ देखील मागितली होती. वारंवार चौकशीसाठी समन्स देऊन देखील संजय राऊत यांच्याकडून कोणतेही उत्तर येत नव्हते. तसंच त्यांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे आता थेट ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी सकाळी साडेसात वाजता ईडीचे पथक पोहचले. त्यांच्या घराबाहेर सध्या कडक बंदोबस्त आहे.

You may like to read

संजय राऊत यांच्या घरी सध्या कुटुंबातील सर्वजण आहेत. पत्राचाळ प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची आज चौकशी केली जाऊ शकते. संपत्तीच्या स्त्रोताबद्दलही त्यांना अनेकदा विचारण्यात आले होते. संजय राऊत यांना समन्स देऊन सुद्धा ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ते वारंवार मी कोणाला घाबरत नसल्याचे सांगत राहिले. आता संजय राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात (ED Office) हजर राहत नसल्यामुळे ईडीने अधिकारी आता थेट चौकशीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. आता कितीवेळ त्यांची चौकशी चालेल हे सांगता येत नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.