By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Pen Drive Bomb In Maharashtra: देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्बवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोडलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb in Maharashtra) प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CID कडे (Crime Investigation department) सोपवण्यात आला आहे.

Pen Drive Bomb In Maharashtra: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोडलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb in Maharashtra) प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CID कडे (Crime Investigation department) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाच तपास अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास CBI कडे न दिल्याने भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण (Advocate Pravin Chavan) यांच्यावर गंभीर आरोप करणारा व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्हचा खुलासा करून खळबळ उडवून दिली होती. फडणवीसांनी पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्याबाबतच राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करताना कशा प्रकारे कट कारस्थान करण्यात आले आहे, याबाबतच खुलासा करणारे अनेक व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत सादर केला होता. तब्बल सव्वाशे तासांचे हे व्हिडिओ सभागृहात दाखवले तर सभागृहाच्या इभ्रतीसाठी ते योग्य ठरणार नाही, असे देखील देवेंद्र फडणवी यांनी सांगितले होते.
राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातच राज्य सरकारने हा कट रचल्याचा गंभीर आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला. गिरीश महाजन यांच्यावर देखील अशाच प्रकारे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारच काय तर राज्यात देखील खळबळ उडाली आहे. गिरीश महाजन यांच्याविरोधात एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचे काम सरकारी वकिलांनी केल्याचा गौप्यस्फोट देखील फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने केलेल्या कटाचा लेखाजोखा या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर अॅड. प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या