Top Recommended Stories

Petrol Dealers Strike Today: घराबाहेर पडण्याआधी ही बातमी जरूर वाचा...आज पेट्रोल डिझेल पंप डिलर्सचा संप, पेट्रोल-डिझेलची टंचाई!

Petrol Dealers Strike Today: महाराष्ट्रासह इतरही राज्यात पेट्रोल डिझेल पंप डिलर्सनं संपाची हाक दिली आहे. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. आज पेट्रोल डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय डिलर्सनी घेतला आहे.

Updated: May 31, 2022 8:14 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Petrol Dealers Strike Today: घराबाहेर पडण्याआधी ही बातमी जरूर वाचा...आज पेट्रोल डिझेल पंप डिलर्सचा संप, पेट्रोल-डिझेलची टंचाई!

Petrol Dealers Strike Today: राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडण्याआधी गाडीत पेट्रोल आहे की नाही, हे बघून घ्या अन्यथा तुमच्यावर गाडी ढकलण्याची वेळ येऊ शकते. इंधन दरवाढीने (Petrol Diesel Price) सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले असताना आज, 31 मे रोजी पेट्रोल पंप डीलर्स संपाचे हत्यार उपसले आहे.

Also Read:

महाराष्ट्रासह इतरही राज्यात पेट्रोल डिझेल पंप डिलर्सनं संपाची हाक दिली आहे. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. आज पेट्रोल डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय डिलर्सनी घेतला आहे. (Petrol Diesel Price todays rates) त्यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

You may like to read

सन 2017 पासून कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, अशी तक्रार पेट्रोल-डिझेलच्या करत त्यांनी हा संप पुकारला आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलवरील करात कपात केली, रातोरात इंधनदरही कमी केले. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल. पण, आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला, असे पेट्रोल पंपचालकांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात क्रमश: 8 आणि 6 रुपयांची कपात केली होती. या निर्णयानंतर राज्य सरकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवरी व्हॅट कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात 31 मे या दिवशी कोणत्याही प्रकारची इंधन खरेदी न करता पेट्रोल पंप डीलर्सनी संपाची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कमीशन / मार्जिन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पेट्रोल पंप चालक-मालक संघटनाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

राज्यात पेट्रोल पंप डीलर्स 31 मे रोजी इंधन खरेदी आणि विक्री बंद ठेवणार आहे. त्यामुळे कालपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वाहनांची पेट्रोल टाकी टाकी फुल्ल करण्यासाठी वाहनधारकांची धावपळ सुरू झाली आहे.

काय आहेत तुमच्या शहरातील दर?

– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डीझेल 89.62 रुपये प्रतिलिटर
– मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डीझेल 97.28 रुपये प्रतिलिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डीझेल 94.24 रुपये प्रतिलिटर
– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डीझेल 92.76 रुपये प्रतिलिटर
– नोएडा पेट्रोल 96.57 रुपये आणि डीझेल 89.96 रुपये प्रतिलिटर
– लखनऊ पेट्रोल 96.57 रुपये आणि डीझेल 89.76 रुपये प्रति लीटर
– जयपूर पेट्रोल 108.48 रुपये आणि डीझेल 93.72 रुपये प्रतिलिटर
– थिरुवनंतपुरम पेट्रोल 107.71 रु आणि डीझेल 96.52 रुपये प्रतिलिटर
– पोर्टब्‍लेयर पेट्रोल 84.10 रुपये आणि डीझेल 79.74 रुपये प्रतिलिटर
– पाटणा पेट्रोल 107.24 रुपये आणि डीझेल 94.04 रुपये प्रतिलिटर
– गुरुग्राम 97.18 रुपये आणि डीझेल 90.05 रुपये प्रतिलिटर
– बंगळुरु पेट्रोल 101.94 रुपये आणि डीझेल 87.89 रुपये प्रतिलिटर
– भुवनेश्वर पेट्रोल 103.19 रुपये आणि डीझेल 94.76 रुपये प्रतिलिटर
– चंडीगड पेट्रोल 96.20 रुपये आणि डीझेल 84.26 रुपये प्रतिलिटर
– हैदराबाद पेट्रोल 109.66 रुपये आणि डीझेल 97.82 रुपये प्रतिलिटर

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.