Top Recommended Stories

PM Modi Lata Mangeshkar Award: लतादीदींच्या नावाचा पहिला पुरस्कार सर्व जनतेचा, संगीताची शक्ती लतादीदींमधून दिसली- पंतप्रधान

PM Modi Lata Mangeshkar Award: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Mangeshkar Award) आज, रविवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांच्या स्मृतीपित्यर्थ जाहीर झालेला पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार (Lata Dinanath Mangeshkar Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता.

Updated: April 24, 2022 6:57 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

PM Modi Lata Mangeshkar Award: लतादीदींच्या नावाचा पहिला पुरस्कार सर्व जनतेचा, संगीताची शक्ती लतादीदींमधून दिसली- पंतप्रधान

PM Modi Lata Mangeshkar Award: मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज सायंकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर (Lata Mangeshkar Award) पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), संपूर्ण मंगेशकर कुटुंब (Mangeshkar Family) उपस्थित होते.

Also Read:

संगीताची शक्ती लतादीदींमधून दिसली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गानसम्राज्ञी लतादीदींच्या नावाने मिळालेला पहिला पुरस्कार देशातील सर्व जनतेचा आहे. संगीताची शक्ती लतादीदींमधून दिसली. मी लतादीदींचा खूप आदर करायचो. माणूस आपल्या वयाने नाही तर कार्याने मोठा असतो, असे त्या नेहमी म्हणायच्या. जो देशासाठी जितके जास्त करतो तो तितका मोठा होत असतो. व्यक्तीच्या विचारांवरुन त्या व्यक्तीचे महात्म्य लक्षात येत. लतादीदींचे वय आणि कार्यानेही मोठ्या होत्या. लतादीदींनी संगीतमध्ये ते स्थान निर्माण केले ज्याने लोक त्यांना सरस्वती देवी मानतात. सिनेसृष्टीतील चार-पाच पिढ्यांना त्यांनी आपला आवाज दिला, असे पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले.
PM Modi

You may like to read

संगीतची साधना आणि इश्वरची साधना एकच…

लतादीदी जेव्हा गाण्याच्या रेकॉर्डिंगला जायच्या तेव्हा चप्पल स्टुडिओच्या बाहेर काढायच्या. संगीतची साधना आणि इश्वरची साधना एकच होती, असे त्या नेहमी सांगायच्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. चार-साडे चार दशकांपूर्वी सुधीर फडकेंनी आमचा परिचय केला होता. तेव्हापासून आजपर्यंत मंगेशकर परिवारासोबत अपार स्नेह, अगणित घटना माझ्या आयुष्याचा भाग बनले. माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीसह मोठी बहीण होती. मला त्यांच्याकडून नेहमी मोठ्या बहिणीसारखं अपार प्रेम मिळालं आहे. यापेक्षा माझ्या आयुष्यातलं मोठं सौभाग्य काय असू शकतं, असे गौरवोरद्गार यावेळी पंतप्रधानांनी काढले. आता राखी पौर्णिमेला दीदी राहणार नाही. लतादीदींच्या नावाने पुरस्कार मिळणं हे सौभाग्य आहे. हा पुरस्कार स्वीकारणं माझं दायित्व आहे. मी या पुरस्काराला संपूर्ण देशवासींना समर्पित करतो, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर उपस्थित राहू शकले नाही. त्यांची प्रकृती ठीक नाही आहे. ते लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. संगीत एक साधना आणि भावना आहे. जो अवक्तला व्यक्त करणार तो शब्द आहे, असे देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले.

संगीतने वीर रस वाढतो. आपण सगळे सौभाग्यशाली आहोत की आपल्या संगीताच्या सामर्थ्य आणि शक्तीला लता दीदींच्या रुपाने साक्षात पाहिलं आहे. मंगेशकर कुटुंब पिढ्यानपिढ्या यज्ञात आपली आहुती देत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 24, 2022 6:56 PM IST

Updated Date: April 24, 2022 6:57 PM IST