Kalyan Crime: डोक्यात खलबत्ता घालून पोलिसची हत्या, पत्नी आणि मुलीने भांडणात उचलले टोकाचे पाऊल!

धक्कदायक म्हणजे पोलिसाच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाशेजारी पत्नी आणि मुलगी तब्बल चार तास बसून होत्या.

Updated: January 7, 2022 2:53 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Police constable murder
Teen killed by boyfriend for not returning smartphone he gifted her

Kalyan Crime : कल्याणमध्ये (Kalyan) पोलिस हवालदाराची हत्या (Police Constable Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडली आहे. पोलिस हवालदाराच्या पत्नी आणि मुलीनेच भांडणादरम्यान हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. प्रकाश राजाराम बोसरे (55 वर्षे) असं हत्या झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. ते मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यात (Kurla Police Station) कार्यरत होते. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी (Kolasewadi police) प्रकाश यांच्या पत्नी ज्योती (45 वर्षे) आणि त्यांची मुलगी भाग्यश्री (27 वर्षे) हिला अटक केली.

Also Read:

प्रकाश बोरसे हे कल्याण पूर्वेकडील नाना पावशे चौक (Nana Pavashe Chauk) परिसरात राहत होते. गुरुवारी रात्री कामावरुन घरी आल्यानंतर प्रकाश बोरसे यांचे पत्नी आणि मुलीसोबत भांडण झाले. मुलगी सासरी नांदत नाही या कारणावरुन त्यांचे भांडण झाले. त्यांची मुलगी भाग्यश्रीचे पतीसोबत पटत नसल्यामुळे ती आपल्या माहेरीच राहत होती. हे भांडण ऐवढे विकोपाला गेले की रागाच्या भरात प्रकाश यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्रीने त्यांच्या डोक्यात खलबत्ता (Murder) घातला. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश यांच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाशेजारी तब्बल चार तास दोघी मायालेकी बसून होत्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकाश बोरसे यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी प्रकाश बोरसे यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा प्रकाश बोरसे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर त्यांच्या मृतदेहाशेजारी त्यांची पत्नी आणि मुलगी बसून होती. ही घटना गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनी प्रकाश बोरसे यांच्या पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 2:51 PM IST

Updated Date: January 7, 2022 2:53 PM IST