Top Recommended Stories

Police Recruitment 2022: तयारीला लागा! 7,200 पदांची पोलिस भरती लवकरच, गहमंत्र्यांनी दिली माहिती

Police Recruitment 2022: सध्या 5,200 पदांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच 7,200 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

Updated: January 29, 2022 9:59 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Maharashtra Police
Maharashtra Police

Police Recruitment 2022: पोलिस दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी ( police force Job recruitment) प्रयत्न करणाऱ्या तरुणांना येत्या काही दिवसांत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये (Maharashtra Police Force) 7,200 पदांसाठी भरती लवकरच होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिलीप वळसे-पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिस भरतीची माहिती दिली.

Also Read:

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी सांगितले की, ‘राज्यात लवकरच 7,200 पोलिस पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) हा निर्णय घेण्यात आला. सध्या 5,200 पदांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच 7,200 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.’ गृहमंत्री यांनी पोलिस भरतीसंदर्भात दिलेल्या माहितीमुळे पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांना दिलासा मिळाला आहे.

You may like to read

तसंच, ‘5200 पोलिसांची भरती करण्याचे काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेने आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचे काम सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7,200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असे वळसे-पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यातील विविध पोलिस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलिस कार्यालयांतर्गत 5200 पोलिस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती (Recruitment for the post of Constable) प्रक्रिया सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलिस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत 5,200 पदांवर तरुणांना पोलिस कॉन्स्टेबल होण्याची संधी मिळणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 29, 2022 9:57 AM IST

Updated Date: January 29, 2022 9:59 AM IST