By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Power workers strike: ऊर्जामंत्र्यांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे
Power workers strike: देशभरतातील कर्मचारी संघटनांनी ( workers union) आपल्या विविध मागण्यासाठी 28 आणि 29 मार्च रोजी संप (strike) पुकारला होता. महाराष्ट्रीत वीज कर्मचारी संघटना देखील या संपात सहभागी झाले होते. दरम्यान, कर्मचारी संघटना व ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांच्यात सकारात्मक चर्चा होत संप मागे घेण्यात आला आहे.

Power workers strike: देशभरतातील कर्मचारी संघटनांनी ( workers union) आपल्या विविध मागण्यासाठी 28 आणि 29 मार्च रोजी संप (strike) पुकारला होता. महाराष्ट्रीत वीज कर्मचारी संघटना देखील या संपात सहभागी झाले होते. दरम्यान, कर्मचारी संघटना व ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांच्यात सकारात्मक चर्चा होत संप मागे घेण्यात आला आहे. चर्चेत ऊर्जामंत्री यांनी वीज कंपन्यांचे खासगीकारण होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला असल्याचे वीज कर्मचारी संघर्ष समितीचे मोहन शर्मा (Mohan Sharma) यांनी सांगितले.
भाजपाने केली होती टीका
या आहेत वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या
– महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांत कार्यरत असलेले कंत्राटी कामगार यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीत संरक्षण द्या.
– केंद्र सरकारच्या विद्युत (संशोधन) बिल 2021 खाजगीकरण धोरणाला वीज कर्मचाऱ्यांकडून विरोध.
– महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांत रिक्त पदे भरण्यात यावी.
– महानिर्मिती कंपनी संचलित करत असलेले जलविद्युत केंद्र खाजगी उद्याजकांना देण्याचं धोरण थांबवण्यात यावे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या