Top Recommended Stories

Pune Building Slab Collapses: मृत कामगारांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारने दिला मदतीचा हात

अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Published: February 4, 2022 4:07 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Pune Building Slab Collapses
Pune Building Slab Collapses

Pune Building Slab Collapses: पुण्यातील (Pune news) येरवड्यामधील (Yerawada) शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून 5 कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Minister Ajit Pawar) यांनी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Also Read:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. इतर जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

You may like to read

दरम्यान, येरवड्यामध्ये अंडर-कंन्स्ट्रक्श मॉलच्या स्लॅबची जाळी गुरुवारी रात्री कोसळली. त्याखाली दबून 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्घटनेमध्ये 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात आले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरु आहे. सर्व मजूर बिहारमधील कटिहार या गावातील असल्याची माहिती मिळाली आहे. पाच गंभीर जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. येथे नेमके किती कामगार काम करत होते याबाबत अधिक तपास सुरु आहे. पण ऐवढ्या रात्री मॉलचे काम कसे सुरु होते? कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही का? असे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 4, 2022 4:07 PM IST