Top Recommended Stories

Pune Building Slab Collapses: येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 5 कामगारांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी

Pune Building Slab Collapses: शास्त्रीनगर भागातील वाडिया बंगल्याजवळ असलेल्या मॉलचे बांधकाम सुरु होते. गुरुवारी रात्री या मॉलच्या साईटवरती स्लॅबसाठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि कामगारांच्या अंगावर पडली.

Updated: February 4, 2022 8:21 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Pune Building Slab Collapses
Pune Building Slab Collapses

Pune Building Slab Collapses : पुण्यातील (Pune) येरवड्यामध्ये अंडर-कंन्स्ट्रक्श मॉलच्या स्लॅबची जाळी कोसळून (Pune Building Slab Collapses) 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. येरवडा परिसरातील (Yerawada) शास्त्रीनगर भागातील वाडिया बंगल्याजवळ ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे येरवडा परिसरात एकच खळबळ उडाली.

Also Read:

You may like to read

शास्त्रीनगर भागातील वाडिया बंगल्याजवळ असलेल्या या मॉलचे बांधकाम सुरु होते. गुरुवारी रात्री या मॉलच्या साईटवरती स्लॅबसाठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि ती कामगारांच्या अंगावर पडली. या जाळीखाली दबून पाच कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमध्ये 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली. तसंच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून (Pune Fire Brigade) देवदूत पथकासह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात आले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरु आहे. पाच गंभीर जखमींवर ससून रुग्णालयात (Sasun Hospital) उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हे कामगार कुठले आहेत आणि नेमके किती कामगार कामावर होते याबाबत अधिक तपास सुरु आहे. पण ऐवढ्या रात्री मॉलचे काम कसे सुरु होते? कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही का? असे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या