Pune Corona Hotspot: पुणेकरांनो काळजी घ्या, मुंबईपाठोपाठ पुणे कोरोनाचा हॉटस्पॉट! अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

राज्यात कोरोनाव्हायरसची तिसरी लाट आली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे तिसऱ्या लाटेत देखील हॉटस्पॉट ठरली आहेत. मुंबईपाठोपाठ पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळून येत आहेत.

Published: January 15, 2022 9:59 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Maharashtra Lockdown Update

Pune Corona Update: मुंबईसह (Mumbai) राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Updates) घट झाल्याचे दिसत असले तरी राज्यात मात्र कोरोनाबाधित (Maharashtra Corona Updates) रुग्णसंख्येचा आलेख सारखा वर चढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 43211 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे 33356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे.

Also Read:

राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांना आकडा 1605 इतका झाला आहे. अशातच राज्याचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेले पुणे (Pune news) हे मुंबईपाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरले आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या 10000 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी शनिवारी तातडीने आढावा बैठक बोलावली आहे.

राज्यात कोरोनाव्हायरसची तिसरी लाट आली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे तिसऱ्या लाटेत देखील हॉटस्पॉट ठरली आहेत. मुंबईपाठोपाठ पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. पुण्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जाहीर केलेले निर्बंध आणखी कडक करायचे का, याबाबत संबंधित बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

खासगीसह शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी फुल्ल…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुणेशहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे गारठा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसत आहे. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी सारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील खासगी तसेच शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी रुग्णांनी फुल्ल झाल्या आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 9:59 AM IST