पुणे : पुण्यात भरदिवसा सहा गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ (Bharati University)  पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 वर्षे असून तो काँग्रेस कार्यकर्ता (Congress worker) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime: Congress worker killed by firing 6 bullets in Pune, incident in Bharati University area)Also Read - Lagir Jhala Ji: 'लागिर झालं जी' मालिकेतील अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू, पुण्याजवळ कारला झाला भीषण अपघात

समीर शेख (Sameer Sheikh) असं हत्या झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पाच राउंड फायरिंग करून हा खून करण्यात आला आहे. घटनेसंदर्भात माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Also Read - मोठी बातमी: चक्क अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरून पुण्यातील बड्या बिल्डरला धमकी

दरम्यान, समीर शेख यांचं वय अंदाजे 30 वर्षे असून ते पुण्यातील फालेनगर भागातील रहिवाशी असल्याचे समजते. ते काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची माहिती देखील समोर आली आहे. शेख यांच्यावर हल्लेखोरांनी 5 राउंड फायरिंग केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत हा सपूर्ण प्रकार घडला आहे. Also Read - Suicide in Pune: सततच्या निर्बंधांमुळे नोकरी गमावलेल्या तरुणाची पुण्यात आत्महत्या