पुणे : पुण्यामध्ये (pune) तीन महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या प्रसिद्ध ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) ही घटना घडली आहे. नर्सच्या वेशभूषेत (fake nurse) आलेल्या एका महिलेने या बाळाला पळवून नेले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.Also Read - Dombivli Gangrape: धक्कादायक! गँगरेपने डोंबिवली शहर हादरले, 14 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

ससून रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये (Ladies Ward) 22 वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्यांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होती. गुरुवारी रात्री 26 वर्षांची आरोपी महिला नर्सच्या वेशभूषेत महिला वॉर्डमध्ये शिरली. यावेळी तिच्यासोबत तिचा पती देखील उपस्थित होता. या आरोपी महिलेने तीन महिन्याच्या मुलीला उचलले आणि पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आपली मुलगी गायब झाल्याचे समजताच बाळाच्या आईने एकच आरडाओरडा केला. Also Read - Car Accident: गोव्याच्या खाडीत कार बुडाली! पुण्यातील नवोदित अभिनेत्रीसह प्रियकराचा मृत्यू

या घटनेमुळे ससून रुग्णालयात एकच गोंधल उडाला होता. याप्रकरणी तात्काळ पोलिसांना (Pune Police) माहिती देण्यात आली. पोलिसांनी आणि काही नागरिकांनी रिक्षातून बाळाला घेऊन पळून जाणाऱ्या आरोपी महिलेचा पाठलाग केला. आरोपी महिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक (Accused Arrested) केली. पोलिसांनी बाळाची सुखरुप सुटका केली आणि बाळाला आईच्या ताब्यात दिले. आपलं चोरी झालेले बाळ मिळाल्यामुळे बाळाच्या आईने सुटकेचा निश्वास सोडला. Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या चोर महिलेला मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे तिने या बाळाला पळवून नेण्याचा प्लॅन केला आणि पतीच्या मदतीने बाळाची चोरी केली. पुण्याच्या ससून सारख्या प्रसिद्ध रुग्णलायत बाळाच्या चोरीची घटना घडल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेचा पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.