Top Recommended Stories

Pune Crime News: पुण्यात चाललंय तरी काय? 12 वर्षीय मुलीसमोर रिक्षाचालकाचे किळसवाणं कृत्य

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुणेसह (Pune City) पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchvad news) परिसरात गुन्हेगारीत (Crime News) मोठी वाढ झाली आहे. अशातच एका रिक्षाचालकाने (Auto Driver) 12 वर्षीय मुलीसमोर हस्तमैथुन केल्याने पुण्यात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.

Published: April 27, 2022 1:18 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Pune Crime News: पुण्यात चाललंय तरी काय? 12 वर्षीय मुलीसमोर रिक्षाचालकाचे किळसवाणं कृत्य

Pune Crime News: पुण्यात (Pune City) गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असताना एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर हस्तमैथुन करणाऱ्या एका विक्षिप्त रिक्षाचालकाला पोलिसांना (Pune Police) अटक केली आहे. सचिन देवीदास शेंडगे (वय-33) असे आरोपीचे नाव आहे. हिंजवडीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 22 एप्रिल, शुक्रवारची ही घटना आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारात पीडित 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी क्लास करून घरी जात होती. तितक्यात आरोपी रिक्षाचालक तिच्याजवळ आला. तिला पत्ता विचारण्याच्या बघाण्याने थांबवलं आणि तिच्यासमोरच हस्तमैथुन केले. रिक्षाचालकाचं किळसवाणं कृत्य पाहून पीडित मुलगी घाबरली. तिने घरी गेल्यानंतर सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितलं.

You may like to read

पीडितेच्या पालकांनी हिंजवडी पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार नोंदवली. तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आजू बाजुला बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी दापोडी परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आपण ओळखू येऊ नये म्हणून आरोपीने त्याच्या रिक्षावरील रेडिअम काढून टाकले होते. पीडितेने आरोपीला ओळखले. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 2012 कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सागर काटे आणि राम गोमरे पुढील तपास करत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.