Pune Crime: येरवडा कारागृहात पोलिस शिपायाची गोळ्या झाडून आत्महत्या, पुणे पोलिस दलात खळबळ!
Pune Crime: अतिदक्षता विभागात या पोलिस शिपायावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान या पोलिसाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime: पुण्यामध्ये पोलिस शिपायाने (Police Constable Suicide) गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहामध्ये (Yerawada Jail) तैनात असले्लया पोलिस शिपायाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या पोलिस शिपायाला तात्काळ ससून रुग्णालयात (Sasun Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात या पोलिस शिपायावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान या पोलिसाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात (Pune Police Force) मोठी खळबळ उडाली आहे.
Also Read:
अमोल माने (Amol Mane)असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. अमोलने येरवडा कारागृहात कार्यरत असतानाच स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास कामावर कार्यरत असताना त्यांच्या जवळ असलेल्या एसएलआर रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तर अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हालवले. गंभीर जखमी झालेल्या अमोल यांना ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. पण उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अमोल यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. अमोल माने हे अहमदनगर येथील रहिवासी होते.
2015मध्ये ते कारागृह पोलिसात भरती झाले होते. सध्या ते येरवडा कारागृहात कार्यरत होते. अमोल यांच्या आत्महत्येमुळे पुणे पोलिस दलामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या