पुणे : पुण्यात संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी संतापजवक घटना घडली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर आठ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर उपचार सुरू असल्याचे वानवडी पोलिसांनी दिली आहे. या संतापजनक घटनेमुळे सांस्कृतीक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणवीर आला आहे.Also Read - Pune Crime: मुलीला समजलं आईचं प्रेमप्रकरण! मागितली 15 लाखांची खंडणी, प्रियकरसह रंगेहाथ पकडलं

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार बाहेरगावाहून येणाऱ्या मित्राला आणण्यासाठी 14 वर्षांयी अल्पवयीन मुलगी रेल्वे स्टेशनवर गेली होती. यावेळी एकटी मुलगी पाहून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवलं आणि तिचं अपहण करून तो तिला एका खोलीत घेऊन गेला. तिथे तिच्यावर आठ जणांनी सामुहिक बलात्कार केला. Also Read - Doctor Couple Suicide in Pune: 'डॉक्टर्स डे'च्या दिवशीच पुण्यात डॉक्टर दाम्प्त्यानं केली आत्महत्या

आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी

यामधील सहा आरोपी हे रिक्षाचालक आहेत तर दोन जण रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. सर्व आरोपींना पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनाववली आहे. पीडित मुलीला रूग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची तब्येत स्थिर असल्याची माहिती वानवडी पोलिसानी दिली आहे.