पुणे: महाराष्ट्रावरील कोरोनाचं (Coronavirus) संकट कमी झालेलं नाही. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta plus Veriant) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध (Maharashtra Lockdown) पुन्हा एकदा कठोर केले आहेत. पुणे शहरासाठी देखील (Pune Loackdown) आजपासून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.Also Read - Wari 2022 : वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडून चोरटा फरार, व्हिडिओ होतोय व्हायरल!

पुणे महापालिका क्षेत्रातील ( Pune Municipal Corporation) सर्व भागासाठी हे नियम असणार आहे. महापालिका आयुक्तांनी सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार, सायंकाळी पाच वाजेनंतर जमावबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यत सुरु राहणार आहे. Also Read - Pune News : सिंहगडावर ट्रेकिंग करताना कडा कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू!

पुणे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुणे शहराची लेव्हल 3 मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. एकप्रकारे पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने (Delta Plus variant of Coronavirus) सगळ्यांची चिंता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कोरोना प्रतिबंधित नियम पुन्हा कठोर करण्यात आले आहे. Also Read - Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, 2 दिवसांत मत मांडले नाही तर ठरणार अपात्र!

काय सुरू, काय बंद?

– अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यत सुरु राहणार
– शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहाणार
– मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद
– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेनं सुरू राहाणार
– उद्याने, मैदानं, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहाणार
– खासगी कार्यालयं कामाच्या दिवशी 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
– अत्यावश्यक सेवासंबंधी शासकीय कार्यालयं 100 टक्के क्षमतेनं सुरू राहणार