Top Recommended Stories

Pune Mhada Lottery 2022 : पुणेकरांसाठी खूशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर 4000 घरांची सोडत जाहीर, जाणून घ्या डिटेल्स

Pune Mhada : सर्व सामान्यांचे पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. दिवाळी मुहूर्तावर पुण्यातील 4 हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.

Updated: October 18, 2022 10:32 AM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीच्या मुहूर्तावर पुण्यातील 4 हजार घरांची सोडत जाहीर !
घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीच्या मुहूर्तावर पुण्यातील 4 हजार घरांची सोडत जाहीर !

Pune Mhada : आपले एक सुंदर आणि छोटेसे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. संपूर्ण आयुष्य काम करुन देखील अनेकांचे घर होत नाही. पुण्यामध्ये घर घेणे म्हणजे सर्व सामान्यांच्या डोक्यावर आयुष्यभरासाठी हप्ते येतात. यासाठीच म्हाडाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतींमध्ये घर खरेदी करण्याची संधी दिली जाते. आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचे घर घेण्याचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकते. आता म्हाडाकडून (Mhada) तब्बल 4 हजार घरांची (house) सोडत जाहीर करण्यात आली आहे.

20 ऑक्टोबरला होणार शुभारंभ

येत्या 20 ऑक्टोबर रोजी या सोडतीचा शुभारंभ केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते ही सोडत जाहीर केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरामधील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरे दिली जाणार आहेत. गुरुवारपासूनच घरांच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे. येत्या शुक्रवारपासून अर्जविक्री स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यानंतर 15 डिसेंबरला सोडत निघेल.

You may like to read

बंपर सोडतीचा विक्रम

पुण्यामधून बंपर सोडत जाहीर केली जात आहे. पुणे म्हाडा जवळपास 3 हजार 930 घरांची सोडत काढणार आहे. पुणे म्हाडाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढली आहे. त्यांच्या या कामामुळे सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या सोडतीने एक नवा विक्रम आता केला आहे. कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 27 हजार 118 लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या सोडतीमार्फत पिंपरी चिंचवडसोबतच सांगली, सोलापुरातही घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

म्हाडाकडून राज्यभरातमध्ये गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येतात. सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. म्हाडाच्या या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांची विक्री करण्यासाठी लॉटरी अर्थात सोडत पद्धत स्वीकारण्यात आली आहे. यापूर्वी चिठ्ठ्या सोडत काढण्यात येत असे. मात्र या सोडत प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. या पार्श्वभूमीवर सोडत पारदर्शक करण्यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.