Top Recommended Stories

Helmet is Mandatory In Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुन्हा हेल्मेट सक्ती, जाणून घ्या काय आहे आदेश

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा (helmet is mandatory in Pune) निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector of Pune dr.Rajesh Deshmukh) यांनी गुरुवारी आदेश काढले. नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर कारवाईचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Published: March 31, 2022 8:28 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

traffic rules for people
traffic rules for people

Helmet is Mandatory In Pune: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा (helmet is mandatory in Pune) निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector of Pune dr.Rajesh Deshmukh) यांनी गुरुवारी आदेश काढले. नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर कारवाईचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. शहरात रस्ते अपघातात आतापर्यंत अनेक बाईकस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

शासकीय कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना हेल्मेट बंधनकारक…

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार, पुण्यात 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. 1 एप्रिलपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. विशेष म्हणजे शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणार आहे. रस्ते अपघातात बाईकस्वारांचा डोक्याला मार मागून मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

You may like to read

दरम्यान, रस्ते अपघातात दगावणाऱ्यांमध्ये सुमारे 80 टक्के प्रमाण दुचाकीस्वार, पादचारी आणि सायकलस्वारांचे आहे. कार चालाकंच्या तुलनेने दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सात पट जास्त आहे. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्यांचे प्रमाण 62 टक्के इतके आहे. त्यामुळे हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास 80 टक्क्यांनी जीव वाचण्याची शक्यता वाढते.

मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार देशात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.