Pune News: पुण्यात तुफान राडा! किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी केली धक्काबुक्की
Pune News: भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांना शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. यावरून मोठी खळबळ उडाली आहे.

Pune News: भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांना शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. यावरून मोठी खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले आहे. किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले असता त्यावेळी हा वाद झाला. काही शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याचे समजते.
Also Read:
मिळालेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात तोफ डागत आहेत. अशातच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत आणि त्यांचे मित्र सुजित पाटकर (Sujit Patkar) यांचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा (100 crore Covid Center scam) केला, असा धक्कादायक खुलासा सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. याच रागातून शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांचा ताफा पुणे महापालिकेच्या आवारात येताच अचानक काही शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने पुणे महानगरपालिकेमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला. जवळपास 80 ते 100 शिवसैनिक जमा झाले होते. त्यांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली आहे.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022
राज्यातील अनेक प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या 5 वर्षांत एकाही प्रकल्पाचे नीट काम झाले नाही, आरोप किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. मात्र, ते करत असलेले आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत. शिवसेना असे खोटे आरोप खपवून घेणार नाही, असा इशारा देखील शिवसैनिकांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला आहे. दुसरीकडे, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात अद्याप किरीट सोमय्या यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. किरीट सोमय्या काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या