Pune Power Supply Disrupted: पुण्यात बत्तीगुल! पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचा वीज पुरवठा पहाटेपासून खंडीत
Pune Power Supply Disrupted: वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा देखील बंद झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु आहे.

Pune Power Supply Disrupted : पुणे (Pune City), पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad City) आणि ग्रामीण भागातील (Pune Rural) वीज पुरवठा खंडीत झाला आहे. पहाटे साडेसहा वाजल्यापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची बत्तीगुल (Pune Power Supply Disrupted) आहे. अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे सकाळपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर अंधारात आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा देखील बंद झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु आहे.
Also Read:
मिळालेल्या माहितीनुसार, महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाइनमध्ये 5 ठिकाणी बुधवारी पहाटे 4.30च्या सुमारास बिघाड म्हणजे ट्रीपिंग झाला. त्यामुळे पहाटे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहासोबत ग्रामी भागाती वीज पुरवठा टप्प्या टप्प्याने बंद होत गेला. तेव्हापासून कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी- चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून लाईट नाही. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे दोन्ही प्रमुख शहरांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वीज पुरवठ्यासोबत पाणी पुरवठा देखील खंडीत झाला आहे.
दरम्यान, दाट धुकं आणि दवं यामुळे टॉवर लाइनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता महापारेषणकडून व्यक्त करण्यात आली आहे. महावितरणाकडून याबाबची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर (Mobile No) एसएमएसद्वारे (SMS) देत आहे. महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील (Tower Line) बिघाड शोधण्याचे काम करत आहे. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण आणि महावितरणाकडून करण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या