
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Pune Rickshaw Fare Increase: पुणे जिल्ह्यात सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ (Pune Rickshaw Fare) होणार असल्याची घोषणा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) सोमवारी केली आहे. ऑटोरिक्षा भाड्यात (Pune autorickshaw fare) दोन रुपयांची वाढ लागू करण्यात येणार असल्याचे पुणे प्रशासनाला कळवण्यात आले आहे. पुण्यात आता ऑटोरिक्षासाठी पहिल्या 1.5 किमीसाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी 14 रुपयांऐवजी 15 रुपये आकारले (Pune autorickshaw bhadevadh) जातील असे आरटीए अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आणि बारामतीमध्येही नवीन भाडेवाढ लागू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत आरटीएने तीन अधिकारक्षेत्रांसाठी भाडे चार्टमध्ये सुधारणा केली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेवटच्या सुधारणा झाल्यानंतर अगदी नऊ महिन्यांनी भाडेवाढ झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लाइव्हमिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी “भाडे वाढवण्याचा निर्णय खटुआ समितीच्या अहवालाच्या शिफारशींच्या आधारे घेण्यात आला आहे आणि सीएनजीच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे भाडेवाढीची मागणीही विचारात घेण्यात आली असे सांगितले. तसेच “यासाठी सर्व रिक्षाचालकांनी त्यांच्या वाहनातील मीटर पुन्हा तपासणे बंधनकारक आहे असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ऑटोरिक्षा युनियनने राज्य परिवहन विभागाकडे टॅरिफमध्ये वाढ करण्याची मागणी केली. एका ऑटोरिक्षा चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “पुणे शहरातील बहुतांश ऑटोरिक्षा सीएनजीवर चालतात कारण ते पेट्रोलपेक्षा किफायतशीर आहे. परंतु येथील वाढत्या किमतीमुळे आमचे मोठे नुकसान होत आहे. 1 ऑगस्टपासून किमती वाढल्याने हा भार कमी होईल”. विशेष म्हणजे, इंधन, खाद्यपदार्थ, एलपीजी आणि इतर अनेक गोष्टींच्या दरवाढीच्या समस्येने देशवासीय त्रस्त असताना ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ जाहीर करण्यात आली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या