Top Recommended Stories

Pune School Reopen Update: पुण्यातील शाळा-कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार, अजित पवारांनी जाहीर केली नियमावली!

Pune School Reopen Update: पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. पण आता 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार...

Published: January 29, 2022 12:39 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar (File Photo)

Pune School Reopen Update : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona Virus) वेग मंदावत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तसंच रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यास परवागी दिली होती. राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा 19 जानेवारीपासून सुरु झाल्या. पण पुण्यातील शाळा सुरु झाल्या नव्हत्या. पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. पण आता पुण्याच्या शाळा आणि कॉलेज सुरु होण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि कॉलेज ( Pune School-College Reopen) सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Also Read:

पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंदर्भातली आढावा बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा-कॉलेज सुरु होणार असल्याचे सांगितले. पुण्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात त्यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, पहिली ते आठवीची शाळा चार तास असणार आहे. ही नियमावली एका आठवड्यासाठी असणार आहे. तसंच राज्यातील महाविद्यालय (Maharashtra College Reopen) येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

You may like to read

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील रुग्णसंख्येत (Pune Corona Patient) घट होत असल्याचे दिसून येत आहे. काही राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे. पण महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्यापैकी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पुण्यातही गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती अजून कमी व्हावी अशी अपेक्षा आहे.’

पुण्यातील शाळांबाबत नियमावली –

– शाळांमध्ये मुलांना पाठवण्याचा निर्णय पालकांचा असणार.

– शाळेची वेळ फक्त चार तासांची.

– विद्यार्थ्यांनी नाश्ता करुन यायचे आणि त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचे.

– मास्क काढायला लागेल अशा एक्टिव्हिटी टाळणार.

– पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचे बंधन करावे.

– नववीच्या शाळा पूर्णवेळ सुरु राहणार.

– पहिले ती आठवीपर्यंतच्या शाळा फक्त चार तास असणार.

– 50 टक्के क्षमतेने शाळा सुरु होणार.

– रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात येतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 29, 2022 12:39 PM IST