पुणे : पुणेकरांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. उद्या 9 ऑगस्टपासून (9 August 2021) पुणे अनलॉक (PUNE UNLOCK) करण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे उद्यापासून (9 August 2021) पुणे अनलॉक (PUNE UNLOCK) होणार आहे.Also Read - 'प्रवीण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा थोबाड आणि गाल रंगवू शकतो', रुपाली चाकणकरांचं ट्वीट

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोमवारी राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्यातील 25 जिल्ह्यांना लॉकडाऊनच्या नियमांपासून दिलासा होता. मात्र पुणे, साताऱ्यासह 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर अधिक असल्याने निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. या सर्व जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. राज्य सरकारच्या या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीनंतर पुण्यातील निर्बंध उद्यापासून शिथिल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. Also Read - Legislative Council: सरकारविरोधात आंदोलन करणं राजू शेट्टींना पडलं महागात, विधान परिषदेच्या यादीतून नाव वगळलं

Also Read - Maharashtra Unlock Update: राज्यात आजपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार?

दुकाने आणि हॉटेल्स सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून द्यावी यासाठी काही दिवसांपूर्वी पुण्यातील व्यापारी आक्रमक (traders and shopkeepers) झाले होते. अखेर प्रशासनाने वेळ वाढवून दिल्याने व्यापाऱ्यांसह हॉटेलचालक आणि दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुकाने आणि हॉटेल्सह सर्व सेवा देणाऱ्या व्यवयासांना विविध निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

9 ऑगस्टपासून पुण्यात कोणते निर्बंध शिथील

  • सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
  • हॉटेल्स आणि रेस्तरॉं रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
  • शनिवार आणि रविवारी सर्व सेवा दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी
  • मॉल्स रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येणार आहे. फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार
  • हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक
  • पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार
  • जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी

    …तर पुन्हा निर्बंध कडक करणार

  • पुणेकरांना निर्बंधात सूट देताना नियमांचे पालन न केल्यास पुन्हा निर्बंध कडक करणार असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. निर्बंध शिथील केले असले तरी कोरोनाचे नियमांचे पालण करावे असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले. तसेच पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यास पुन्हा निर्बंध कडक करण्यात येतील असा इशारा देखील त्यांनी दिला.