पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा (water supply in pune ) बंद राहणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. येत्या गुरुवारी वडगाव आणि लष्कर जलकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी जपून वापण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune Water Supply News Update)Also Read - Lagir Jhala Ji: 'लागिर झालं जी' मालिकेतील अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू, पुण्याजवळ कारला झाला भीषण अपघात

पाणीपुरवठा विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुण्यात गुरुवारी लष्कर जलकेंद्रात आणि वडगाव येथे देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी पुण्यातील बहुतांशी ठिकाणी पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी (10 डिसेंबर) दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी दीड दिवस पाणी जपून वापरावं असा सल्ला पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे. Also Read - Pune Corona Hotspot: पुणेकरांनो काळजी घ्या, मुंबईपाठोपाठ पुणे कोरोनाचा हॉटस्पॉट! अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

पाणी पुरवठा बंद कुठे बंद राहणार?

वडगाव जलकेंद्र हद्दीतील सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा बुद्रुक याठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे. Also Read - Suicide in Pune: सततच्या निर्बंधांमुळे नोकरी गमावलेल्या तरुणाची पुण्यात आत्महत्या