Top Recommended Stories

Rainfall Update : मुंबईसह कोकणामध्ये 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी!

Rainfall Update : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Published: June 30, 2022 5:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Monsoon Update
Monsoon Update

Rainfall Update : कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt along the Konkan coast) निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy To Heavy Rainfall) पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह कोकणामध्ये (Kokan Rain) पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून (Monoon) सक्रिय राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यासर्व ठिकाणी 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्टवर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

You may like to read

आज सकाळपासून मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई आणि विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. याठिकाणी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशामध्ये आता पुढचे तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळए रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, हवामान खात्याने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>