By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
मोठी बातमी! औरंगाबादेतील सभेतील विघ्ने दूर होण्यासाठी Raj Thackeray नी घेतला 150 पुरोहितांचा आशीर्वाद, घरी केले गणेश पूजन...
Raj Thackeray Aurangabad Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची उद्या, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) औरंगाबादेत जाहीर सभा (Raj Thackeray Aurangabad Rally) होणार आहे. सभेची तयारी जोरात सुरू आहे. राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे (Pune to Aurangabad) रवाना होणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबादेतील सभेतील विघ्ने दूर होण्यासाठी राज ठाकरे यांनी तब्बल 100 ते 150 पुरोहितांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याहस्ते पुण्यातील निवासस्थानी गणेश पूजन (Ganesh Poojan) केल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray Aurangabad Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) औरंगाबादेत जाहीर सभा (Raj Thackeray Aurangabad Rally) होणार आहे. सभेची तयारी जोरात सुरू आहे. राज यांच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आज औरंगाबादकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी राज यांनी पुण्यातील निवास स्थानी धार्मिक विधी केले. 150 पुरोहितांकडून गणेश पूजन करवून घेत औरंगाबादेतील सभा निर्विघ्न पार पडण्यासाठी आशीर्वाद घेतला. सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर राज ठाकरे शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह औरंगाबादकडे रवाना होणार आहे. दुसरीकडे, औरंगाबादेत राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी मनसे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. राज ठाकरे यांचे जंगी स्वागत होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी शनिवारी सकाळपासून पुरोहितांची मंदियाळी जमली आहे. जवळपास 100 ते 150 पुरोहितांकडून गणेश पूजन, मंत्र पठण हनुमान चालीसा पठण करण्यात येत आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेतील सर्व विघ्ने दूर होण्यासाठी राज ठाकरे यांनी घरी धार्मिक विधी केल्याचे समजते.
2000 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेची जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या सह मनसेचे ज्येष्ठ नेते आज सायंकाळी औरंगाबादेत पोहोचणार आहेत. मनसे नेत्यांकडून सभा मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त राहाणार आहे. 8 डीसीपी, 15 एसीपी आणि 65 पीआय आणि 6 राज्य राखीव दलाच्या तुकड्या अशे सुमारे 2000 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहाणार आहेत.
राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष…
राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी सशर्त परवागगी देण्यात आली आहे. सभास्थळी 15 हजार नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी असेल. तसेच मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास त्यासाठी आयोजकांना दोषी धरण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरून भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे औरंगाबादेतील सभेत काय बोलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या