By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Raj Thackeray News: राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांचा दणका, जाहीर सभेपूर्वी घेतला मोठा निर्णय
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Cheif Raj Thackeray) येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) औरंगाबाद (Raj Thackeray Aurangabad Rally) येथे जाहीर सभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा टीझर (Teaser) जारी करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे यांचे लक्ष हिंदुत्व आणि भगव्यावर दिसत आहे. मात्र, राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांना दणका दिला आहे. सभेपूर्वीच औरंगाबाद शहरात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.

Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Cheif Raj Thackeray) येत्या 1 मे (Maharashtra Din) रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार आहे. मनसेने सभेची जय्यत तयारी (Raj Thackeray Aurangabad Rally) सुरू केली आहे. स्टेजची उभारणीचे काम सुरू झाले असून मनसेने टीझर (MNS Teaser) जारी केला आहे. टीझरमध्ये औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे औरंगाबाद पोलिसांनी शहरात आजपासून जमावबंदीचा लागू केली आहे. 9 मेपर्यंत लागू असेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
राज ठाकरे यांच्या जाहीर सभेपूर्वीच औरंगाबाद शहरात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे धरणे मोर्चा, मिरवणूक, निदर्शने, जाहीर सभा घेण्यास काढण्यास मनाईचे आदेश लागू झाले आहेत. परंतु मनसे 1 मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेवर ठाम आहे. अशात राज यांच्या सभेला परवानगी मिळणार का, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काय म्हणाले औरंगाबादचे पोलिस आयुक्त?
राज ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या तोंडावर औरंगाबाद शहरात पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या 37 (1) आणि (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ शकणार नाही. निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश काढला आहे.
काय आहे राज ठाकरेंच्या टीझरमध्ये?
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरला ‘राज गर्जना’ असे शीर्षक देण्यात आले आहे. तसेच या टीझरमध्ये औरंगाबाद शहराचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करण्यात आला आहे. टीझरमध्ये सगळे लक्ष हिंदुत्व आणि भगव्यावरच दिसत आहे. मनसेने टीझरच्या माध्यमातून नागरिकांना सभेला येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या