By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
औरंगाबादकडे येताना Raj Thackeray यांच्या ताफ्याचा अपघात; अभिनेता अंकुश चौधरी थोडक्यात बचावला
Raj Thackeray Sabha: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्याला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद येथील सभेसाठी पुण्याहून येताना राज ठाकरेंच्या ताफ्याती गाड्या एकमेकांवर आदळ्याने हा अपघात झाला. यात दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) थोडक्यात बचावले आहे.

Raj Thackeray Sabha: औरंगाबाद येथील सभेसाठी पुण्याहून निघालेले मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्याला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात (Raj Thackeray convoy accident) 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे या ताफ्यात मराठी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि अभिनेते अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) हे देखील होते. या अपघातात दोघेही सुखरुप आहे. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी 1 मे रोजी औरंगाबाद नियोजित सभा आहे. या सभेसाठी आज ते औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्यापूर्वी सकाळी त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. पुणे-औरंगाबाद महामार्गाने औरंगाबादकडे येताना राज ठाकरेंच्या ताफ्यात 30 ते 40 गाड्यांचा समवेश होता. औरंगाबादपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असताना या ताफ्यात अपघात झाला. अपघातावेळी राज ठाकरेंची गाडी पुढे होती. ताफ्यातील मधल्या गाड्यांनी ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यातील एका मर्सिडीज गाडीत अभिनेता अंकुश चौधरी आणि केदार शिंदे होते. लोकमतच्या वृत्तानुसार ते दोघेही सुखरूप आहेत.
राज्यात सध्या हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात एल्गार पुकारत त्यावर बंदी घालण्यासाठी सरकारला (Maharashtra Government) 3 मे पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी सभा घेण्याचे जाहीर केली होते. या सभेकडे राज्याचं लक्षं लागलं आहे. त्यांचा हा दौराही चर्चेत असून औरंगाबादमध्ये मनसे नेते व कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी कारण्यात आली आहे.
या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र संस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या आहे. याच मैदानावरून त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र दिनी होणार्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मनसेने राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत काय गर्जना करता याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या