Rajmata Jijau Janyati : राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना असे शिकवले महान राज्यकर्त्याचे गुण

जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली आणि ते अस्तत्त्वात आणण्यासाठी त्यांना शिक्षणासोबत, युद्ध कौशल्य आणि बुद्धी चातुर्याचे धडे देखील दिले. पुढे जिजाऊंच्या कल्पणेतील स्वराज्य उभे राहिले.

Updated: January 12, 2022 1:26 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Rajmata Jijau Janyati : राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना असे शिकवले महान राज्यकर्त्याचे गुण
Rajmata Jijau Janyati Rajmata Jijau taught Chhatrapati Shivaji Maharaj the virtues of great rulers

Rajmata Jijau Janyati : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंची (Rajmata Jijau) आज जयंती आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना प्राचीन भारताचा महान इतिहास आणि रामायण, महाभारत यांसारख्या धर्मग्रंथांचे ज्ञान दिले. विविधअंगी शिक्षण देऊन जिजाऊंनी शिवाजी महाराजांना (Shivaji Maharaj) एक व्यापक दृष्टिकोण आणि प्रजेविषयी संवेदनेची भावाना दिली. पती शहाजी राजे भोसले (Shahaji Raje Bhosle) आणि आपल्या स्वराज्याची (Swarajya) कल्पणा जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात रोवली. पुढे याच कल्पणेने वास्तवाचे रुप घेतले. जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मनात स्वराज्याची ज्योत पेटवली आणि ते अस्तत्त्वात आणण्यासाठी त्यांना शिक्षणासोबत, युद्ध कौशल्य आणि बुद्धी चातुर्याचे धडे देखील दिले. पुढे जिजाऊंच्या कल्पणेतील स्वराज्य उभे राहिले. त्यामुळे त्यांना मराठा साम्राज्याची (Maratha Empire) राजमाता देखील म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या चरित्राबद्दल…

Also Read:

राजमाता (Rajmata Jijau) जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथील जिजाऊ महाल येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहाच्या दरबारात जामिनदार होते. लखुजी जाधव (Lakhuji Jadhav) निजामशाही राज्याचा एक छोटासा भाग सांभाळत होते. जिजाऊंच्या आईचे नाव महालसाबाई जाधव (Mahalsabai Jadhav) होते. योध्यांच्या घराण्यात जन्म झालेल्या जिजाऊंना लहापनापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. पुढे जिजाऊंचा विवाह वेरूळ येथील शाहजी भोंसले यांच्याशी झाला. लग्नानंतर त्या जिजाबाई भोंसले या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

जिजाऊं कार्य हे मध्ययुगीन कालखंडातील आहे. त्याकाळी हिंदुस्थानात सर्वत्र जुलुमशाही सत्ता अधिकाररूढ होत्या. मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही या राजवटी स्थानिक प्रजेवर प्रचंड जुलूम, अत्याचार करत होत्या. अशा प्रतिकूल काळात 17व्या शतकाच्या मध्यात शहाजीराजांच्या मनात ‘स्वराज्य’ची कल्पणा निर्माण झाली. हळूहळू त्यांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली. अनेकदा प्रयत्न करूनही स्वकियांचा विरोध, बहुजन समाजाची अस्थिरता आणि वेगवेगळ्या शाह्यांमध्ये विभागलेल्या मराठा सरदारांचे सहकार्य न मिळाल्यामुळे शहाजीराजांना स्वराज्याचे स्वप्न साकार करता आले नाही. मात्र त्यांची ही कल्पणा पुढे जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात रुजवली. शहाजी राज्यांनी जिजाऊंनासोबत घेऊन स्वराज्य निर्मितीचा चंग बांधला. राजमाता जिजाऊंनीदेखील त्यांना खंबीर साथ देत स्वराज्याृचे स्वप्न पुर्णत्वास नेण्यासाठी शिवाजी महाराजांना तयार केले.

जिजाऊंचा शहाजी राजांसोबत स्वराज्य स्थापनेचा प्रवास सोपा नव्हात. सुरुवातीच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि धावपळ करावी लागली. एवढ्या संघर्षाच्या या काळात एखादी स्त्री हताश झाली असती. मात्र जिजाऊंनी बालशिवाजीला सोबत घेतले आणि अत्यंत प्रतिकूल कौटुंबिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीत बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. खंबीर नेतृत्व, करारी बाणा व धाडसी वृत्ती हे जिजाऊंचे गुणवैशिष्ट्य होते. याच्याच बळावर त्या हिंदवी स्वराज्याच्या राजमाता झाल्या.

जिजाबाईंचा मृत्यू
17 जून 1674 रोजी पाचाड येथे जिजाबाईंचा मृत्यू झाला. जिजाबाईंच्या मृत्यूसमयी त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांचे पती शहाजी त्यांच्या मृत्यूच्या 10 वर्षांपूर्वी म्हणजे 1664 मध्ये मरण पावले होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 6:00 AM IST

Updated Date: January 12, 2022 1:26 PM IST