Top Recommended Stories

Rape in Mumbai: धक्कादायक! 35 वर्षीय लेखिकेवर मुंबईत बलात्कार, नराधमाने दाऊदच्या नावाने धमकावले

Rape in Mumbai: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) नावाने धमकावत एका 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार (Rape in Mumbai) करण्यात आला आहे. नराधम हा 75 वर्षाचा असून तो एक व्यावसायिक असल्याचे समजते.

Published: June 16, 2022 1:42 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

minor girl

Rape in Mumbai: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) काळिमा फासणारी घटना उडकीस आली आहे. एका 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार (Rape Case in Mumbai) करण्यात आला आहे. मुंबईच्या जुहू (Juhoo) येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे नराधम आरोपी 75 वर्षांचा असून तो व्यावसायिक आहे. पीडितेने दिलेल्या (Mumbai Crime) तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अंबोली पोलिस स्टेशनमध्ये (Mumbai Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडितेला अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिनच्या (Underworld Don Dawood Ibrahim) नावाने धमाकावल्याची माहिती समोर आली आहे.

Also Read:

अंबोली पोलिस स्टेशनमध्ये पीडित महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. दादरमध्ये राहणाऱ्या एका 75 वर्षीय व्यावसायिकाने तिच्यावर अंधेरीच्या जेबीनगर येथील द ऑन टाईम हॉटेलमध्ये मे महिन्यात अनेकादा अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे नराधकाने पीडितेला याबाबत कुठेही वाश्चता न करण्यास बजावले. अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम माझा मित्र आहे. हाजी मस्तान माझा पत्नीच्या बहिणीचा नवरा होता. कुठे काही सांगितले तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील दिली. तक्रारीनुसार शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

You may like to read

2 कोटी व्याजाने घेतले…

नराधमाने पीडित महिलेकडून व्याजाने 2 कोटी रुपये घेतले होते. परंतु ते तिला परत केले नाहा. पीडितेने पैशासाठी तगादा लावला. तर नराधमाने तिला दाऊद इब्राईमची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

दाऊद इब्राहिम हा सन 1993 मध्ये मुंबई झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. दाऊद इब्राहिमच्या नावाने हत्या, खंडणी, जिवे मारण्याच्या धमक्या आतापर्यंत समोर आल्या आहे. परंतु चक्क दाऊदच्या नावाने धमकावत एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिस देखील चक्रावले आहेत. पोलिस या प्रकरणी तपशील गोळा करत आहेत.

काका-पुतणीच्या नात्याला काळिमा…

दुसरीकडे, भिवंडी तालुक्यात अशीच एक बलात्काराची घटना समोर आली आहे. काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. काकासह चुलत भावाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी पळून जाण्याच्या बेतात होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.