मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातला (Maharashtra Politics), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत व दु:ख कायम मनात राहणार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Minister Ajit Pawar) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील (RR Patil Birth Anniversary) यांना आदरांजली वाहिली.Also Read - Happy Birthday Ajitdada: अजित पवार यांना सुप्रियाताईंकडून वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट

रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर.आर.पाटील अर्थात सर्वसामान्यांचे आबा. आज, 16 ऑगस्टला आबांचा वाढदिवसं. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या अंजनी गावातला 16 ऑगस्ट 1957 ला आबांचा जन्म झाला होता.

गृहमंत्रिपदाच्या काळात त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं. ग्रामीण विकासाची आस आर.आर.आबांनी रुजवली. आबांचं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनली. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरती प्रक्रियेच्या आबांच्या निर्णयानं हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारं खुली करुन दिली. डान्स बार बंदी (Dance Bar Ban Maharashtra), गुटखाबंदीच्या (Gutakha Ban in Maharashtra) त्यांच्या निर्णयानं महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केले.

शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येकाला आदर असलेलं, आपलंसं वाटणारं त्यांचं नेतृत्व होतं असं सांगत स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्मृतींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले.

कुशाल राजकीय नेतृत्त्व.. असे आबा पुन्हा होणे नाही!

घरची परिस्थिती हालाखीची, पण शाळेत एकदम हुशार व्यक्तिमत्व दहावीच्या परीक्षेत (SSC Eaxm) तर आबा केंद्रात पहिले आले होते. पण परिस्थितीमुळे काम करत करत त्यांना पुढचं शिक्षण घ्यावं लागलं. कमवा आणि शिका योजनेत काम करुन ते पुढचं शिक्षण घेऊ लागले. कॉलेज जीवनात त्यांनी विद्यार्थ्यांचं संघटन केलं. पुढे आबांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा आबांचा राजकीय प्रवास डोळे दिपवणाराच आहे. कुशाल राजकीय नेतृत्त्व असलेले आर.आर.पाटील शेवटपर्यंत सर्वसामान्यांसाठी आबाच राहिले. त्यांनी स्वत:चा ‘आबासाहेब’ होऊ दिला नाही, हे विशेष!