By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Saamana Agralekh: राज्याच्या राजकीय संकटामागे भाजप, 50-50 कोटी देऊन बंडखोरांना विकत घेतले- शिवसेनेचा आरोप
Saamana Agralekh: शिवसेनेने आपले मुखपत्र सामनातून भाजप आणि बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजप म्हणते ही शिवसेनेची अंतर्गत बाब आहे, परंतु बंडखोरांना सुरक्षा देणे या संपूर्ण घटनेत भाजपचा हात असल्याचे दर्शवते येते. या आमदारांना भाजपने 50-50 कोटी देऊन विकत घेतले, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

Saamana Agralekh, Maharashtra Political Crisis: राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाबाबत (Maharashtra Political Crisis) शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामधून (Saamana) भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या इशाऱ्यावर बंडखोर आमदार सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेने (Shiv Sena) केला आहे. बंडखोर आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा (Y + Grade Security) पुरवल्याबद्दल शिवसेनेने केंद्र सरकारवरही टीका केली आहे. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात (Saamana Agralekh) म्हटले आहे की, भाजप म्हणते ही शिवसेनेची अंतर्गत बाब आहे, परंतु बंडखोरांना सुरक्षा देणे या संपूर्ण घटनेत भाजपचा (BJP) हात असल्याचे दिसून येते. 50-50 कोटी देऊन भाजपने या आमदारांना विकत घेतल्याचा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.
Also Read:
- Maharashtra Winter Session Highlights: सीमावादावरुन अधिवेशन तापलं! अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने
- Nirbhaya Fund for Security : एकनाथ शिंदेंच्या आमदारांसाठी निर्भया निधीचा वापर? विरोधकांचा आरोप
- PM Narendra Modi: 'शार्टकटच्या राजकारणाची विकृती वाढतेय', पीएम मोदींनी विरोधकांवर केला हल्लाबोल
सामनामध्ये लिहिलेल्या लेखात बंडखोर आमदारांना ‘नाच्ये’ म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात केंद्रानेही उडी घेतल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. राज्यातील ‘नाच्ये’ आमदार त्यांच्या (भाजपच्या) तालावर नाचत आहेत. गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व ‘नाच्ये’ (बंडखोर आमदार) आपला महाराष्ट्र देशद्रोह दाखवून देशभरात आणि जगभर राज्य सरकारची बदनामी करत आहेत. केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजपनेच या बंडखोरांना भडकावले आहे. भाजपने राजकीय नाटकाची पटकथा लिहिली आहे, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.
बंडखोरांना देशद्रोही ठरवत केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारात ढवळाढवळ करत असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, तेथे केंद्र आणि भाजप घटनात्मक अधिकारांमध्ये ढवळाढवळ करत आहेत. याचे उदाहरण पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, दिल्लीसह अनेक बिगर भाजपशासित राज्यांमध्ये पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र देशद्रोह्यांना विनाकारण ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय राज्याच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. याची किंमत त्यांना भविष्यात चुकवावी लागेल, असे सामनात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात (CM Udhhav Thackeray) वेगळा गट स्थापन करून आव्हान दिले आहे. आपल्याला 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक नगरसेवक आणि खासदारही आपल्या संपर्कात असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या